शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

vidhan sabha assembly election result 2024: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत, साताऱ्यात महायुतीचा झेंडा

By दीपक शिंदे | Updated: November 23, 2024 14:36 IST

दीपक शिंदे सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा ...

दीपक शिंदेसातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा गड ढासळला असून महायुतीचाच बालेकिल्ला तयार झाला आहे. भाजपच्या चार, शिंदेसेनेच्या दोन आणि अजित पवार गटाने दोन जागांवर विजय मिळवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील विजयापर्यंत पोहोचू दिले नाही.सातारा विधानसभेच्या आठ जागांपैकी साताऱ्याच्या जागेवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षित विजय मिळविला. त्यांना किती लीड मिळणार एवढीच उत्सुकता होती. त्यांनी १ लाख ७५ हजार ६२ मते मिळवत उद्धवसेनेच्या अमित कदम यांचा १ लाख ४० हजार मतांनी पराभव केला.वाई विधानसभा मतदारसंघातही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटील यांनी ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव केला.कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांचा शिंदेसेनेच्या महेश शिंदे यांनी अटीतटीच्या लढाईत पराभव केला.फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना शह देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले उमेदवार सचिन पाटील यांना निवडून आणले. माजी आमदार दीपक चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याबरोबरच रामराजेंचा मतदारसंघावरील प्रभाव कमी करण्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही यश आले.

पाटणमध्ये शंभुराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात चांगली लढत झाली. उद्धवसेनेचे हर्षद कदम किती मते घेतात त्यावर या ठिकाणचा निकाल अवलंबून होता. मात्र, त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे शंभुराज देसाई यांचा विजय सोपा झाला.कऱ्हाड उत्तर मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब पाटील यांना शह देत भाजपच्या मनोज घोरपडे यांनी विजयश्री खेचून आणला. त्यांना शेवटच्या टप्प्यात शह देण्याचा प्रयत्न झाला मात्र पहिल्यापासून मतदारसंघात सुरू केलेला झंझावात रोखण्यात विरोधकांना यश आले नाही.

माण मतदारसंघातून भाजपच्या जयकुमार गोरे यांनी पहिल्यापासून आघाडी घेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर घार्गे यांचा पराभव केला. घार्गे यांच्या बाजूने आमचं ठरलंयचे सर्व नेते येऊन देखील त्यांना आपल्यात एकी ठेवता आली नाही. तर जयकुमार गोरे यांच्या मदतीला बंधू शेखर गोरे आणि दिलीप येळगावकर आल्यामुळे त्यांना आपला विजयश्री सोपा करता आला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभवराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी भाजपचे अतुल भोसले यांनी विजय मिळविला आहे. पहिल्या फेरीपासूनच अतुल भोसले आघाडीवर होती. मतमोजणीच्या फेऱ्या वाढल्या तसे त्यांचे मताधिक्यही वाढत गेले. सुमारे ४० हजारांहून अधिक मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024satara-acसाताराkarad-north-acकराड उत्तरkarad-south-acकराड दक्षिणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024