शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Video : दोन महिन्यांपासून शेकडो एसटी जागेवरच; टायरला पडतायत चिरा, 'कोणीही या बसा'चेही प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 18:02 IST

संपाच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दोन महिन्यापासून शेकडो गाड्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत.

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप करून अडीच महिने होऊन गेले आहेत. जवळजवळ दोन महिन्यापासून शेकडो गाड्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळे फार काही फटका बसेल असे वाटत असले तरी गेल्या लॉकडाऊननंतर आलेल्या अनुभवातून दिसत आहे. गाड्यांच्या केवळ बॅटऱ्या डाऊन होणे, चाकातील हवा कमी झाल्याने टायरला  चिरा जाणे हे प्रकार घडू शकतात.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. संपाचा तोडगा सुटत नसल्याने जवळजवळ महिन्यापासून गाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. आताच कोठे काही दिवसांपासून लालपरी धावू लागली आहे. पण, अजूनही शेकडो गाड्या बसस्थानकात उभ्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी भासण्याचा धोका असतो. पण, तांत्रिक विभागातील कर्मचारी कुशल असल्याने संप मिटल्यानंतर दुसऱ्या बॅटऱ्या जोडून गाड्या सुरू करता येतील. हाच प्रकार गेल्या लॉकडाऊनमध्येही अनुभवास आला होता. संप मागे घेतल्यानंतर काही तासात एसटी धावू शकते.जिल्ह्यातील आगारनिहाय एसटी

सातारा ११४कऱ्हाड ८६फलटण ९०वडूज ५४दहिवडी ४७मेढा ४४वाई ५३महाबळेश्वर ४२खंडाळा ४०कोरेगाव ५०पाटण ६०

कोणी या गाडीत बसासातारा मध्यवर्ती बसस्थानकात एका कोपऱ्या मोठ्या प्रमाणावर गाड्या उभ्या आहेत. यातील कोणत्याच गाड्यांना कुलूप नसल्याने कोणीही येऊन आत जाऊन बसत असतात. त्याचप्रमाणे शिवशाही गाड्यांमध्येही होतात. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी शिवशाहीत जाऊन अज्ञात प्रवाशांनी गाडी पेटवली होती.

विनाकारण डिझेल जाळणेवापरात नसलेल्या गाड्यांच्या बॅटऱ्या डाऊन होऊ नयेत म्हणून त्या अधूनमधून चालू कराव्या लागतात. त्यामुळे कर्तव्यावर असलेले चालक एसटी सुरू करून ठेवतात. तसेच आगारातून एखादा राऊंड मारत असतात. त्यामुळे विनाकारण खर्च करावा लागत असतो.

एसटी कितीही दिवस एकाच ठिकाणी उभी असली तरी फार काही नुकसान होत नाही. तरीही संबंधित टायर चिरू नये, बॅटऱ्या डाऊन होऊ नयेत म्हणून हवा भरणे, एखादी फेरी नियमित मारली जाते.भोसले, यंत्र अभियंता चालन, सातारा.

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र