वेणुताई चव्हाण स्कूलमध्ये पी. डी. पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST2021-07-02T04:26:12+5:302021-07-02T04:26:12+5:30

कऱ्हाड : येथील वेणुताई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवंगत पी. डी. पाटील यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवाजी ...

In Venutai Chavan School, P. D. Greetings to Patil | वेणुताई चव्हाण स्कूलमध्ये पी. डी. पाटील यांना अभिवादन

वेणुताई चव्हाण स्कूलमध्ये पी. डी. पाटील यांना अभिवादन

कऱ्हाड : येथील वेणुताई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवंगत पी. डी. पाटील यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवंगत पी. डी. पाटील यांची जयंती गुरुवारी कऱ्हाड शहरासह परिसरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. वेणुताई चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दरवर्षी जयंतीदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र गतवर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम करता येत नाहीत. गुरुवारी स्कूलमध्ये जयंतीदिनी पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिक एम. बी. कुंभार, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका एम. व्ही. विभुते यांच्यासह सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो : ०१केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड येथील वेणुताई चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पी. डी. पाटील यांच्या जयंतीदिनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: In Venutai Chavan School, P. D. Greetings to Patil