स्मशानभूमीत तोडफोड; झाडेही कापली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:47+5:302021-06-22T04:25:47+5:30
साबळेवाडीची स्मशानभूमी ढेबेवाडी-पाटण मार्गावरील मंद्रुळकोळे गावानजीक असलेल्या वांग नदीच्या काठावर आहे. ग्रामपंचायत व लोकसहभागातून तेथे विविध सुविधा पुरविण्यात आलेल्या ...

स्मशानभूमीत तोडफोड; झाडेही कापली!
साबळेवाडीची स्मशानभूमी ढेबेवाडी-पाटण मार्गावरील मंद्रुळकोळे गावानजीक असलेल्या वांग नदीच्या काठावर आहे. ग्रामपंचायत व लोकसहभागातून तेथे विविध सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. तेथे रक्षाविसर्जनास येणाऱ्या ग्रामस्थांसाठी ढेबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब साबळे यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या आईच्या स्मरणार्थ बाकडे बांधून दिले आहेत. त्याशिवाय ग्रामपंचायतीने परिसरात सुशोभीकरणासाठी आठ-दहा फुट उंचीची झाडेही लावलेली आहेत. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी तेथील बाकड्यांची तोडफोड करून झाडेही कापून टाकल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निवास साबळे, ग्रामसेवक बाळासाहेब जाधवर यांनी रविवारी रात्री उशीरा ढेबेवाडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज देऊन नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली. पोलीस पाटील बाळासाहेब साबळे, निळकंठ साबळे, बबन यादव, सुरेश साबळे, भास्कर माने आदी उपस्थित होते.
फोटो : २१केआरडी०२
कॅप्शन : साबळेवाडी, ता. पाटण येथील स्मशानभूमीची अज्ञातांनी तोडफोड केली. तेथील बाकडे मोडण्यात आले आहेत. (छाया : बाळासाहेब रोडे)