व्हॉल्व्हला गळती... दूषित पाणीपुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:51+5:302021-06-16T04:50:51+5:30
शामगाव : करवडी (ता. कऱ्हाड) येथे व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे गत महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे ...

व्हॉल्व्हला गळती... दूषित पाणीपुरवठा!
शामगाव : करवडी (ता. कऱ्हाड) येथे व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे गत महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी याची त्वरित दुरुस्ती करून पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
संपूर्ण जगावर कोरोनासारख्या रोगाचे संकट आहे, अशा या भयानक साथरोगाचा सामना करण्यासाठी शासकीय व लोकांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. लोक अगदी शिंका आल्या तरी घाबरून जात आहेत. यापासून वाचण्यासाठी गरम पाणी पिणे, वाफ घेणे आदी घरगुती उपचार लोक करत आहेत व आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. अशी भयंकर परिस्थिती असताना करवडी येथे पिण्याचे पाणी दूषित येत आहे. गत महिन्यापासून गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागली आहे.
लिकेज व्हॉल्व्हमध्ये मिसळल्यामुळे गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या साथरोगाने गावांमध्ये प्रवेश केला तर आवरणे कठीण होईल. ग्रामस्थांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिले आहे. परंतु यावरील उपाययोजना त्यांच्याकडून युद्धपातळीवर केल्या जात नाहीत. गत जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी ग्रामपंचायतीने त्वरित याकडे लक्ष घालून ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
(कोट..)
गावांमध्ये गत महिन्यापासून पाणीपुरवठा पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागली आहे. त्यामुळे गटाराचे पाणी मिसळल्याने गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिली आहे. परंतु ग्रामपंचायतीकडून यावर उपाययोजना होत नाही, तरी हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तरी याची त्वरित दुरुस्ती व्हावी.
-वैभव चव्हाण, करवडी, ग्रामस्थ
चौकट
पिण्यासाठी विकतचे पाणी...
गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी लोकांना शुद्ध पाणी विकत घेऊन प्यावे लागते आहे. गरिबांना हे परवडणारे नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून दुरुस्त करावे, अशी मागणी होत आहे.
फोटो आहे..
१४शामगाव
करवडी (ता. कऱ्हाड) येथे व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे गत महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. (छाया : बाळकृष्ण शिंदे)