जिल्ह्यात आता मोबाईल व्हॅनमधून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:12+5:302021-06-22T04:26:12+5:30
सातारा : अति अति दुर्गम भागांमध्ये मोबाईल व्हॅनमधून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री बाळासाहेब ...

जिल्ह्यात आता मोबाईल व्हॅनमधून लसीकरण
सातारा : अति अति दुर्गम भागांमध्ये मोबाईल व्हॅनमधून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लसीकरण व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
जिव्हिका हेल्थ केअरकडून लसीकरणासाठी या दोन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गावापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील, वाड्यावस्त्यांवर ही रुग्णवाहिका जाणार असून, येथील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दिशानिर्देश देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये लसीकरण मोहीम राबवताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. तसेच तेथील लोकांना लसीकरण केंद्रावर येणे देखील शक्य नसल्याने प्रशासनाच्या या रुग्णवाहिकांचा त्यांना निश्चितपणे लाभ होणार आहे.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णवाहिकांची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.