संतोष गुरवकराड : अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे जगात युद्धाचा भडका उडाला असून इस्रायलचे इराणवर क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत. युद्धा दरम्यान, इराणने दुबई-अबू धाबीवर हल्ला केल्यामुळे कराडसहित राज्यातील विविध भागांतील नागरिक दुबईत अडकले आहेत. कराडमधील विमा कंपनीकडून सेमीनारसाठी गेलेले विमा कंपनीतील विमा अधिकारी पी. व्ही. जाधव यांच्यासह २६ हून अधिकजण दुबईमध्ये अडकून पडले आहेत.दरम्यान, यांच्यामध्ये कराडमधील प्रतीक जाधव यांचे देखील आई-बाबा असल्यामुळे त्यांनी नुकताच त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली तसेच काळजी घ्या, अशी हाक दिली.पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चिपळूण, नाशिक हे डिव्हीजनमधून एकूण ४०० जण सेमिनारला बुधवारी (दि.२६) गेले. तेथील खर्च विमा कंपनी आणि टूर्स कंपनीकडून व्यवस्था केली जात आहे.
विमा प्रतिनिधींमध्ये 'यांचा' समावेशकराड येथील प्रतीक जाधव यांचे वडील पी. व्ही. जाधव यांच्यासह शारदा जाधव, सतीश जाधव, उमेश सूर्यवंशी, सुनील कचरे, साधना पाटील, विपुल नाईगडे, महेश ढेकळे, संतोष माने हे कराडमधून विमा कंपनीमार्फत दुबईला एका सेमीनारसाठी गेले आहेत.
सोमवारी प्रशासनाकडून कुटुंबीयांशी संपर्कअमेरिका आणि इराणमधील हल्ल्याबाबत माहिती सर्वत्र पसरल्यानंतर रविवारी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासन सतर्क झाले. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला. दरम्यान, सातारा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी देवीदास कामत यांनी कराडमधील पी. व्ही. जाधव यांच्या सुपुत्र प्रतीक जाधव याच्याशी फोनवरून संपर्क करून वडिलांसह कराडवरून गेलेल्यांबाबत माहिती व फोन नंबर घेतले.
अमेरिकेकडून हल्ला झाल्याची माहिती समजतात वडील पी. व्ही. जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘आम्ही सध्या सुखरूप असून लवकरच परत येऊ, असे सांगितले. त्यांच्याशी बोलल्यानंतर समाधान वाटले. आता आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आमच्या कुटुंबीयांसह सातारा जिल्ह्यातील व राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना लवकर परत भारतात आणावे. - प्रतीक पी. व्ही. जाधव, कराड
Web Summary : Karad residents worry as relatives are stuck in Dubai after US-Iran conflict. A son contacted his parents, seminar attendees, via video call. Around 400 people from various regions are stranded; families urge government assistance for their safe return.
Web Summary : अमेरिका-ईरान संघर्ष के बाद दुबई में कराड के रिश्तेदार फंसे, जिससे निवासी चिंतित हैं। एक बेटे ने वीडियो कॉल के माध्यम से अपने माता-पिता से संपर्क किया। विभिन्न क्षेत्रों के लगभग 400 लोग फंसे हुए हैं; परिवार उनकी सुरक्षित वापसी के लिए सरकार से सहायता का आग्रह करते हैं।