शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

US-Israel-Iran war: परदेशवारी लांबणीवर; सातारकरांचा दुबई, बाली, व्हिएतनामला ‘टाटा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:51 IST

आंतरराष्ट्रीय टूर तूर्त रद्द 

सातारा : अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सध्या आखाती देशांसह जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाचे पडसाद आता थेट सातारकर पर्यटकांच्या नियोजनावर उमटू लागले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातून दुबई, बाली, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया, भूतान, नेपाळ यांसारख्या प्रमुख देशांकडे जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टूर तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतरच परदेशवारीचे नियोजन करण्याचा निर्णय पर्यटकांनी घेतला आहे.सातारा जिल्हा निसर्गसमृद्ध असला तरी, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातून विदेशवारी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त सातारकर मोठ्या प्रमाणावर परदेशात स्थायिक आहेत. प्रामुख्याने दुबई, व्हिएतनाम, मलेशिया, बँकॉक, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान ही सातारकरांची सर्वाधिक पसंतीची पर्यटनस्थळे आहेत. अनेकांनी उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर आपली दुबई आणि आखाती देशांची वारी आगाऊ आरक्षित केली होती. यासाठी नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही जय्यत तयारी केली होती. मात्र, अमेरिका, इराण आणि दुबई परिसरातील वाढत्या तणावामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे.सातारा जिल्ह्यात सुमारे ३८ अधिकृत ट्रॅव्हल्स कंपन्या कार्यरत आहेत. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यातील बहुतांश कंपन्यांनी आपल्या नियोजित आंतरराष्ट्रीय सहली स्थगित केल्या आहेत. जोपर्यंत युद्ध थांबून परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत या सहली सुरू होणार नाहीत, अशी माहिती ट्रॅव्हल्स चालकांकडून देण्यात आली.

काश्मीरमधील तणावानंतरही देशांतर्गत पर्यटनाकडे नागरिकांनी काही काळ पाठ फिरवली होती. सुमारे आठ-दहा महिन्यांनंतर तेथील परिस्थिती सुरळीत झाली. आता जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने सर्व मोठ्या देशांची पर्यटन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च आहे. परिस्थिती शांत झाल्यानंतरच पुन्हा पर्यटनाचे चक्र गतिमान होईल. - गिरीश साठे, टूर चालक, सातारा

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran tensions halt Satara's international travel plans; tours postponed.

Web Summary : Satara residents postpone international trips due to US-Iran tensions. Tours to Dubai, Vietnam, and other destinations are cancelled for safety. Travel agencies halt services until stability returns, impacting the tourism sector significantly.