शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात वळवाचा साडेआठ हजार शेतकऱ्यांना फटका, पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:30 IST

१९८३ घरांनाही पावसाचा दणका

सातारा : जिल्ह्यात मागील मे महिन्याच्या उत्तरार्धात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, तसेच वळवाचा ८ हजार ४६६ शेतकऱ्यांनाही फटका बसला असून, २ हजार ४८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १ हजार ९८३ घरांनाही पावसामुळे दणका बसला आहे. तरीही अजून पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात १८ मे नंतर वळवाचा पाऊस सुरू झाला. वाऱ्याबरोबरच धो-धो पाऊस पडत होता. सलग ७ दिवस कोसळधारा सुरू होत्या. त्यातच तब्बल ५० महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे शेती, पिके, घरे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.तरीही आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २ हजार ४८४ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, बाजरी, टोमॅटो, भुईमूग, भाजीपाला, ढोबळी मिरची आदी पिकांना फटका बसला आहे. यामध्ये ७ हजार ६६१ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना भरपाईपोटी २ कोटी ३४ लाख रुपये लागण्याचा अंदाज आहे, तसेच पावसात ८०५ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. १६९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. यासाठी ११ लाख ७२ हजार रुपयांची मदत अपेक्षित आहे.

पाऊस काळात दोघांचा मृत्यू..जिल्ह्यातील पाऊस काळात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे. माण तालुक्यात नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडल्याने बुडून एकाचा मृत्यू झाला आहे, तर खटाव तालुक्यात विजेचा धक्का बसल्याने एक जण मृत झाला आहे.

२९ गोठे पडले..संपूर्ण जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडला. यामध्ये सर्वच ११ तालुक्यांत घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झालेले आहे. अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या १ हजार ९६९ आहे, तर १४ घरे पूर्णपणे पडलेली आहेत, तर जनावरांचे २९ गोठे बाधित झाले आहेत. यासाठी १ कोटी २ लाख ६१ हजारांचा निधी मदतीसाठी लागण्याचा अंदाज आहे.

५५ जनावरांचा मृत्यू..वळीव पावसाचा शेतकऱ्यांनाच अधिक करून फटका बसला आहे. पिकांचे नुकसान झाले, तसेच जमीनही वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे. गोठेही पडले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील तीन तालुक्यांत लहान ३७ आणि मोठी १८ जनावरेही मृत झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfarmingशेतीFarmerशेतकरी