शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 12:23 PM

MuncipaltyCarporation, satara, onlinemeeting सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड पालिकेच्या ऑनलाईन सभेत जाहीर करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येऊन मनोज शेंडे यांचा सत्कार केला.

ठळक मुद्देसातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवडकरंज्यात सहाव्यांदा उपाध्यक्षपद!

सातारा : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड पालिकेच्या ऑनलाईन सभेत जाहीर करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येऊन मनोज शेंडे यांचा सत्कार केला.सातारा नगरपालिका निवडणुकीत २०१६ मध्ये सातारा विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून माधवी कदम या निवडून आल्या होत्या. खा. उदयनराजे भोसले यांनी प्रारंभी राजू भोसले त्यानंतर सुहास राजेभोसले, किशोर शिंदे यांना उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार किशोर शिंदे यांनी माधवी कदम यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.गुरुवारी सकाळी दहा ते बारा नामनिर्देशन पत्र दाखल करणे, दुपारी सव्वाबारा वाजता मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून अर्ज छाननी आणि त्यानंतर दुपारी पावणे एक वाजता पीठासन अधिकारी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली . निवडीनंतर माधवी कदम, किशोर शिंदे ‌यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.करंज्यात सहाव्यांदा उपाध्यक्षपद!करंजे भागातून सातारा पालिकेचे उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी श्रीपतराव पाटील, बाबूराव पाटील, राजू भोसले, अशोक भोसले, बबन यादव यांनी हे पद भूषविले आहे. मनोज शेंडे यांच्या रुपाने सहव्यांदा उपाध्यक्ष पद मिळाले आहे. महादेव भोसले आणि सुजाता भोसले यांनाही याच भागातून नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती.

साताऱ्याचा घनकचरा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याचे नियोजन करणार आहे. सातारकरांच्या कामांसाठी सतत केबिनमध्ये आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी बांधकाम सभापतिपदी काम केल्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाची माहिती आहे. नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक अधिकारी यांना सोबत घेऊन काम करणार.- मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष, सातारा

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर