शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

 Satara: अज्ञाताने कारच्या चाकाची नट केले लूज, बांधकाम व्यावसायिक अपघातातून बचावला; गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Updated: August 10, 2023 14:34 IST

सातारा : कारचा अपघात व्हावा म्हणून बांधकाम व्यावसायिकाच्या कारच्या पुढील चाकाचे नट अज्ञाताने लूज केले. अशा अवस्थेत बांधकाम व्यावसायिकाने ...

सातारा : कारचा अपघात व्हावा म्हणून बांधकाम व्यावसायिकाच्या कारच्या पुढील चाकाचे नट अज्ञाताने लूज केले. अशा अवस्थेत बांधकाम व्यावसायिकाने कार सात किलोमीटर नेली. मात्र, एका पुलावर कारचे चाक निखळण्याअगोदरच हा प्रकार निदर्शनास आला. यामुळे त्यांचा जीव वाचला. ही धक्कादायक घटना पाटण येथे घडली. याप्रकरणी अज्ञातावर पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कोळेकर (वय ४३, रा. पेठशिवापूर, ता. पाटण) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये कार उभी असताना अज्ञाताने त्यांच्या कारच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकाचे नटबोल्ड लूज केले. मात्र, त्यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. ते कार घेऊन नेहमीप्रमाणे घरातून सकाळी बाहेर पडले. घरापासून पाच ते सात किलोमीटर गेल्यानंतर एका पुलावर आवाज आला म्हणून त्यांनी कार पुलावर थांबवली. त्यावेळी चाकाला चारीही नट नव्हते. चाक निखळून पडण्याच्या बेतात असतानाच हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकारानंतर कोळेकर यांनी पाटण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर व्यक्तीगत सुरक्षेला धोका निर्माण करणे (३३६) या कलमान्वये पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हवालदार आर. डी. पगडे हे अधिक तपास करीत आहेत.सीसीटीव्ही तपासणार...कोळेकर यांच्या घराजवळ ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. या कार्यालयात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या घराकडे रात्रीच्या सुमारास कोणी गेले होते का, हे समोर येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस