Unbelievable murder of father-in-law in Phaltan | शिवीगाळवरून वाद : फलटणमध्ये सासऱ्याकडून सुनेचा निर्घृण खून
शिवीगाळवरून वाद : फलटणमध्ये सासऱ्याकडून सुनेचा निर्घृण खून

ठळक मुद्देफलटणमध्ये सासऱ्याकडून सुनेचा निर्घृण खूनशिवीगाळवरून वाद विकोपाला : मारहाणीत सासराही गंभीर जखमी

फलटण : जेवताना शिवीगाळ केल्याच्या वादातून जाधववाडी, ता. फलटण येथे सासऱ्याने सुनेचा चाकूने वार करुन निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी सासऱ्यालाही बेदम मारहाण केली. जखमी सासऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आम्रपाली शाम पवार (वय २३, रा. जाधववाडी, ता. फलटण) असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहराशेजारी जाधववाडी येथे पवार कुटुंबीय वास्तव्यास आहे. रविवारी रात्री आम्रपाली पवार हिला सासरा चांडवल झबझब पवार (वय ५०) याने शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, आम्रपाली आणि अन्य नातेवाईकांनी सासरा चांडवल पवार याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर चिडलेल्या चांडवल याने आम्रपालीच्या मानेवर चाकूने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला. नातेवाईकांच्या मारहाणीमध्ये चांडवल सुद्धा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर फलटण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी कविता चांडवल पवार (वय ४५) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चांडवल पवारवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सासरा चांडवल याला मारहाण केल्याप्रकरणी आम्रपालीच्या नातेवाईकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण हे करीत आहेत.

Web Title: Unbelievable murder of father-in-law in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.