वडूज : खटाव तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ या आशयाची बातमी ह्यलोकमतह्ण प्रसिद्ध झाल्यानंतर विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी महसूल विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व त्यांच्या पथकाने छापे टाकून दहा ब्रास वाळूसाठा जप्त केला.याबाबतची माहिती अशी की, दहशत माजवत वाळू माफिये खुलेआम वाळू उपसा करीत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. याची दखल घेत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कडक कारवाईचे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचाऱ्यांनी धाड टाकत हा वाळू साठा जप्त केला. या कारवाईचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.तालुक्यात वाळू उपसा करीत असताना वाळू माफिया व त्यांच्या हस्तकांकडून दहशत माजवली जात आहे. त्याचप्रमाणे परिसरातील शेतकरी व महिलांना देखील सातत्याने नाहक त्रास दिला जात आहे. तरी महसूल व पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हे केव्हा दाखल होतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेकायदा वाळू साठा जप्त, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:01 IST
वडूज : खटाव तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ या आशयाची बातमी ह्यलोकमतह्ण प्रसिद्ध झाल्यानंतर विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी ...
बेकायदा वाळू साठा जप्त, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई
ठळक मुद्देबेकायदा वाळू साठा जप्त, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई लोकमतच्या वृत्तानंतर महसूल विभागाची कारवाई