शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात भाजपच्या बैठकीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रिपदाचा ठराव

By दीपक शिंदे | Updated: June 21, 2024 12:56 IST

राज्यसभेवर जिल्ह्यातीलच पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक आढावा बैठकीत खासदार उदयनराजेंना केंद्रात आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात मंत्रिपद देण्याबाबत तसेच उदयनराजे लोकसभेचे खासदार झाल्याने राज्यसभेवर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यालाच संधी मिळावी, असा ठराव एकमताने करण्यात आला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर भाजपची आढावा बैठक झाली. यावेळी सातारा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, अविनाश कदम आदी उपस्थित होते.या बैठकीत सातारा लोकसभांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा आणि त्यांना केंद्रात चांगले मंत्रिपद मिळावे, यासाठी ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला. सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना मोठे मताधिक्य देण्याचे काम केले. त्यामुळे त्याबद्दल शिवेंद्रसिंहराजेंना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला.माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी विधानसभा बैठक आणि वैयक्तिक मांडणीमधील विषयाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कोअर कमिटीकडे देणार असल्याचे सांगितले.यावेळी सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, कऱ्हाड उत्तरचे आणि विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, प्रिया शिंदे, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, कऱ्हाड दक्षिणचे निवडणूक प्रमुख धनंजय पाटील, कोरेगावचे विधानसभा निवडणूक प्रमुख भरत मुळे, पाटणचे विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रमबाबा पाटणकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेBJPभाजपा