साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे तर स्वयंभू नेते : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 09:07 IST2018-04-09T12:43:37+5:302018-04-10T09:07:03+5:30
'साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर स्वयंभू नेते आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील,' असा प्रतीप्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पत्रकारांना विचारला. त्यामुळे उपस्थितांच्यात खसखस पिकली.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे तर स्वयंभू नेते : अजित पवार
कऱ्हाड : ' साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर स्वयंभू नेते आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गणती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील,' असा प्रतीप्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पत्रकारांना विचारला. त्यामुळे उपस्थितांच्यात खसखस पिकली.
येथील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी नाष्ट्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने राष्ट्रवादीचा हल्लाबोल होत असताना साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यामध्ये दिसत नाहीत. याबाबत छेडले असता ते प्रथमत: गालातल्या गालात हसले आणि या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरूवात केली.
अजित पवार म्हणाले, 'खरंतर उदयनराजेंची काम करण्याची पद्धत आमच्यापेक्षा तुम्हा पत्रकारांना जास्त माहिती आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. ते साहेबांसोबत असतात. एवढेच सांगणे त्यांनी पसंत केले.'
दरम्यान, रविवारी साताऱ्यात झालेल्या हल्लाबोल यात्रा व जाहीर सभेकडे उदयनराजेंनी पाठ फिरवली. तर शिवेंद्रसिंहराजेंनी मी साताऱ्याचा मालक आहे, असे एकट्या कोणी समजू नये, असे नाव न घेता उदयनराजेंवरच हल्ला चढवला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेले हे उत्तर राजकीयदृष्ट्या तर्कवितर्क लावणारे आहे.