शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क, टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारणी; उदयनराजेंकडून संकल्पनामा जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:27 IST

निर्धारित संकल्प पूर्णत्वाची ग्वाही

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर संकल्पनामा जाहीर केला. यामध्ये सातारा, कऱ्हाड आणि वाई येथे आयटी पार्क उभारणे, टेक्नाॅलाॅजी सेंटर सुरू करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उदयनराजे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संकल्पनामा तयार केला आहे. जिल्ह्यातील निर्धारित संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाहीही दिलेली आहे.जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. पाणी, वीज, रस्ते अशा सुविधा असूनही मोठे उद्योग फारसे नाहीत. यासाठी केंद्रीय सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाकडून साताऱ्यात टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच हे सेंटर आणि त्यायोगे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच जिल्हा पर्यटनात अग्रेसर राहावा, यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. यासाठी अजून काही प्रकल्प विचारधीन आहेत, असेही संकल्पनाम्यात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलाय. त्यामुळे मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असते. यातून रोजगार निर्माण होणार आहे. यासाठी चित्रीकरण एक उद्योग म्हणून आकाराला येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृष्णा नदी माथा ते पायथा स्वच्छता, प्रदूषणमुक्त आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच नर्सिंग, दंतवैद्यक, शेती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी अग्रेसर राहणार, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने साहित्य कला विद्यालयाची निर्मिती, देशातील पहिले बैलगाडा स्टेडियम सातारा लोकसभा मतदारसंघात करण्यात येणार, जिल्ह्यामधील धरणातील पाणी शेतीला आणि पिण्यासाठी पुरेसे मिळण्यासाठी प्रयत्न करणार, असेही या संकल्पनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले