शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

उदयनराजेंचे तिकीट पक्के; शरद पवारांनी व्यक्त केली 'ही' इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 7:49 PM

उदयनराजेंनी भाजपसोबतही जवळीक वाढविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर जात त्यांची स्तुतीही केली होती. तसेच पत्रकारांशीही ते खुलेपणाने बोलत होते. यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होत होती.

सातारा : लोकसभेच्या जागांसाठी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट सातारा गाठत खासदार उदयनराजेंची भेट घेतली. उदयनराजेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवारांनी राष्ट्रवादीतून तिकीट पक्के झाल्याचे सांगत त्यांची इच्छाही व्यक्त केली आहे. आता उदयनराजे पवारांची ही इच्छा पूर्ण करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 उदयनराजेंनी भाजपसोबतही जवळीक वाढविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर जात त्यांची स्तुतीही केली होती. तसेच पत्रकारांशीही ते खुलेपणाने बोलत होते. यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होत होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पटत नसल्याने उदयनराजे पक्षाच्या प्रचारापासून दूर राहत होते. यामुळे पवारांनी साताऱ्यात भेट घेत उदयनराजेंना तिकीट पक्के असल्याची खात्री दिली. तसेच राज्यभरात पक्षाचा प्रचार करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. 

उदयनराजेंवर प्रेम करणारे आणि त्यांची क्रेझ असलेले अनेक तरुण राज्यभर आहेत. त्यांच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलचीही बरेचजण कॉपी करतात. या तरुणाईला राष्ट्रवादीकडे वळविल्यास त्याचा लोकसभेसह विधानसभेलाही फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे पवारांनी त्यांना राज्यभर पक्षाच्या प्रचारासाठी येण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस