शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासाठी उदयनराजेंची मारामारी : रघुनाथराजे

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

फलटणमध्ये गौप्यस्फोट : दोन्ही राजे समोरासमोर येताच मिटेल संघर्ष; मठाचीवाडी येथील कार्यक्रमात भावनिक आवाहन

सातारा : सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकरांचे घराणे या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही घराण्यातील नातेसंबंध साडेचारशे वर्षांपासूनचे आहेत. सध्या या दोन घराण्यात जो राजेसंघर्ष सुरू आहे त्याचा नात्यांवर परिणाम होत आहे. राजकारण क्षणिक आहे. उदयनराजेंनी माझ्यासाठी पूर्वी मारामारी केली होती. त्यांचे माझ्यावर प्रेम असून राजकारणासाठी मी उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुखावणार नाही, असे भावुक उद्गार रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ‘राजेसंघर्ष’ सुरू असून यानिमित्तानं आता राजे घराण्यांतील दोस्तानाही समोर आला आहे. मठाचीवाडी, ता. फलटण येथील एका सत्कार समारंभात ते बोलत होते. जिल्ह्यात सध्या खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषद सभापती रामराज नाईक-निंबाळकर यांच्यात जी शाब्दिक चकमक सुरू आहे त्याअनुषंगाने बोलताना रघुनाथराजे यांनी याबाबत खंत व्यक्त केली.रघनाथराजे म्हणाले, ‘राजकारणामुळे उदयनराजेंसारखी प्रेमाची माणसे दुरावतात, त्यामुळे यापुढे प्रेमाच्या माणसांना एकही शब्द बोलणार नाही. दोन्ही घराण्याचे साडेचारखे वर्षांपासूनचे नातेसंबंध आहेत. आजपर्यंतच्या तेरा पिढ्यांमध्ये नऊवेळा दोन्ही घराण्यात नातेबंध प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही घराण्याला जाज्वल्य इतिहास आहे. केवळ क्षणिक राजकारणासाठी या नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे दोघे जोपर्यंत समोरासमोर येत नाहीत, तोपर्यंत दोघांमधील वैचारिक मतभेद संपणार नाहीत आणि आरोप-प्रत्यारोपांचे हे बॅडमिंटन असेच सुरूच राहणार आहे. या राजेसंघर्षाला पूर्णविराम मिळाला पाहिजे. मठाचीवाडी येथील स्वप्नील भोसले यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आरटीओपदी निवड झाली आहे. यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते स्वप्नील भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेलसध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.तरच ‘राजेसंघर्षा’ला पूर्णविराम मिळेलसध्या जिल्ह्यात सातारचे भोसले घराणे आणि फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे यांच्यात जी शाब्दिक लढाई सुरू आहे ती केवळ राजकारणामुळेच. मात्र, क्षणिक राजकारणापायी दोन्ही घराण्यातील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ नये, यासाठी दोघांनीही समोरासमोर येण्याची गरज आहे. ज्यावेळी उदयनराजे आणि रामराजे समोरासमोर येतील तेव्हा ‘राजेसंघर्ष’ संपलेला असेल, अशी अपेक्षा रघुनाथराजेंनी व्यक्त केली.