शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:52 PM

उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सातारा - उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या भाजपाप्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय वर्तुळातून तसेच समाजमाध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहे. मात्र यादरम्यान, उदयनराजेंचे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. शिवेंद्रसिंहराजे यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असेल्या सातारा राजघराण्यातील या दोन सदस्यांच्या आजच्या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविले. नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या विचारांशी सहमत असल्यामुळे भाजपा प्रवेश केला आहे. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. निस्वार्थ भावेनेतून लोकांच्या हितासाठी भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी उदयनराजे भोसले यांनी सांगितले.तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांनी  मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेBJPभाजपा