शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

सातारा जिल्ह्यात विविध अपघातात दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:26 AM

सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना रविवारी घडली. मयूर शंकर काटकर (वय २३, ...

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात विविध अपघातात दोन युवक ठारभरधाव रिक्षा उभ्या कारला धडकली; तीन गंभीर जखमी

सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना रविवारी घडली. मयूर शंकर काटकर (वय २३, रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव), विनोद बळीराम बांदल (वय २३, रा. नेवलेकरवाडी पो. करंदी, ता. जावळी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, विनोद बांदल हा शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भुर्इंजहून पाचवडकडे मोटारसायकलवरून निघाला होता. यावेळी पाचवड येथे लक्झरी बसला त्याची जोरदार धडक बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.दुसरा अपघात कोरेगाव येथे झाला. मयूर काटकर हा कोरेगाव येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा नेमका कसा झाला, हे रुग्णालयातील पोलिसांना समजले नाही.

भरधाव रिक्षा उभ्या कारला धडकली; तीन गंभीर जखमी 

 नातेवाईकांच्या यात्रेवरून परतताना भरधाव रिक्षा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडकल्याने रिक्षाचालकासह चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.विजय शंकर मोरे (वय ४२, रिक्षाचालक रा. कारी, ता. सातारा), श्रावण साहेबराव पवार (वय ३१, रा. आंबळे, ता. सातारा), पिंटू मोतीराम जाधव (वय ३८, रा. आसनगाव, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, परळी भागामध्ये रविवारी यात्रा होती. या यात्रेसाठी हे सर्वजण रिक्षाने तेथे गेले होते. परळीहून कारीकडे जात असताना परळी येथील मंदिराजवळ एक कार उभी होती. या कारला धरधाव रिक्षा समोरून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला.

रिक्षाचालक विजय मोरे यांच्यासह श्रावण पवार, पिंटू जाधव, किरण पवार हेही गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना रुग्णवाहिकेने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, किरण पवार हा उपचार न घेताच रुग्णालयातून निघून गेला.

इतर तिघांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील पोलिसांनी या तिघांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनी मद्यप्राषन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकारची नोंद सिव्हिलमधील रजिस्टरमध्ये केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर