शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Satara: टेम्पोखाली सापडून दोन तरुणी जागीच ठार, आटके टप्पा येथे अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:12 IST

कऱ्हाड : टेम्पोने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील दोन तरुणी टेम्पोच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर आटके (ता. ...

कऱ्हाड : टेम्पोने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील दोन तरुणी टेम्पोच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर आटके (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत बुधवारी हा अपघात झाला. करिष्मा ऊर्फ प्राजक्ता कृष्णत कळसे (वय २७, रा. रेठरे खुर्द, ता. कऱ्हाड), पूजा रामचंद्र कुऱ्हाडे (२५, रा. येरवळे, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या, तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील करिष्मा आणि येरवळे येथील पूजा या दोघीही मलकापूर येथील डीमार्ट मॉलमध्ये नोकरी करीत होत्या. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची कामावरून सुटी झाली. त्यांचाच एक सहकारी आजारी असल्याने, त्या वाठार येथे त्या सहकाऱ्याला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या.आटके टप्पा येथे त्या पोहोचल्या असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील पूजा आणि करिष्मा या दोघी टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. डोक्यावरून चाक गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह अपघात विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले, तसेच वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAccidentअपघातDeathमृत्यू