अंगणात उभ्या केलेल्या कारची दोन चाके गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 13:28 IST2019-09-16T13:27:30+5:302019-09-16T13:28:27+5:30
अंगणात उभ्या केलेल्या कारची पाठीमागील दोन चाके चोरून नेल्याची घटना सदर बझारमध्ये मध्यरात्री घडली.

अंगणात उभ्या केलेल्या कारची दोन चाके गायब
ठळक मुद्देअंगणात उभ्या केलेल्या कारची दोन चाके गायबशहर पोलीस ठाण्यात तक्रार
सातारा : अंगणात उभ्या केलेल्या कारची पाठीमागील दोन चाके चोरून नेल्याची घटना सदर बझारमध्ये मध्यरात्री घडली.
अजमल शेख (वय ६३, रा. देसाई कॉलनी, सदर बझार सातारा) यांनी त्यांची कार (एमएच १० ई ६२३१) अंगणात उभी केली होती.
रात्री त्यांच्या कारची पाठीमागील दोन चाके चोरट्याने लंपास केली. कारला आधार म्हणून चोरट्याने विटा लावल्या होत्या. शेख कुटुंबीयांच्या हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.