Satara: दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात वडील जागीच ठार; मुलगा गंभीर

By संजय पाटील | Published: April 2, 2024 03:30 PM2024-04-02T15:30:50+5:302024-04-02T15:33:05+5:30

कऱ्हाड : माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून वडील जागीच ठार झाले. तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर ...

Two-wheeler-tempo head-on collision; father died and The boy is serious, Accident on Karad Chandoli route | Satara: दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात वडील जागीच ठार; मुलगा गंभीर

Satara: दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात वडील जागीच ठार; मुलगा गंभीर

कऱ्हाड : माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून वडील जागीच ठार झाले. तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. दुसरा  पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून सुदैवाने सुखरूप बचावला. कऱ्हाड-चांदोली मार्गावर कालेटेक, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

अंकूश मुरलीधर नडवणे (वय ४०, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर मुलगा ओंकार अंकूश नडवणे (१२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील अंकूश नडवणे हे त्यांच्या दोन मुलांना घेवून मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन (क्र. एमएच ५० टी १२०१) उंडाळेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कालेटेक गावच्या हद्दीत डीपी जैन कंपनीसमोर उंडाळेहून कऱ्हाडकडे निघालेल्या माल वाहतूक टेम्पोची (एमएच ५० - ५२४०) आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अंकूश नडवणे हे जागीच ठार झाले. तर मुलगा ओंकार हा गंभीर जखमी झाला. दुसºया पाच वर्षीय मुलाला किरकोळ दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमी ओंकार याला तातडीने रुग्णालयात हलवले.

अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघाताची नोंद कºहाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Two-wheeler-tempo head-on collision; father died and The boy is serious, Accident on Karad Chandoli route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.