शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोंडवे येथे चालत्या दुचाकीवर दोघांवर गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:16 IST

एक हल्लेखोर ताब्यात, एक पसार

सातारा : कोंडवे, ता.सातारा येथे चालत्या दुचाकीवर दोघांवर गोळीबार करण्यात आला असून, यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाच्या पोटरीवर गोळी लागली, तर दुसऱ्या तरुणाच्या कमरेला गोळी चाटून गेल्याने तोही यात जखमी झाला. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने एका हल्लेखोराला तातडीने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चाैकशी सुरू आहे. ही घटना सोमवारी घडली.अमर गणेश पवार (वय २१, रा.मोळाचा ओढा, सातारा), श्रेयस सुधीर भोसले (वय २१, रा.तामजाईनगर, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. अमर पवार आणि श्रेयस भोसले हे दोघे मेढा येथे न्यायालयात तारखेसाठी गेले होते. दुपारी तीननंतर ते दुचाकीवरुन साताऱ्याला यायला निघाले. कोंडवे येथील एका पेट्रोलपंपासमोर आल्यानंतर दुचाकीवर असलेल्या दोघा हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तुलातून अमर पवार याच्यावर गोळीबार केला. यावेळी एक गोळी अमर याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागली, तर दुसरी गोळी श्रेयसच्या कमरेला खरचटून गेल्याने तोही यात जखमी झाला. गोळीबार केल्यानंतर संबंधित हल्लेखोरे तेथून मोळाचा ओढ्याकडे पसार झाले.

कोंडवे येथे गोळीबार झाल्याचे समजताच, पोलिस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्यासह एलसीबीची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर, पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यातील पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीमध्ये हा सारा घटनाक्रम कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या आधारे पोलिसांनी एका हल्लेखोराला तातडीने साताऱ्यातून ताब्यात घेतले, तर त्याचा दुसरा साथीदार फरार आहे.कास येथे काही दिवसांपूर्वी बारबालाच्या डान्सवरून बाचाबाची झाली होती. त्यातून हा हल्ला पाळत ठेवून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे.

नेम चुकला.. अन् थोडक्यात वाचलाअमर पवार हा दुचाकीवर पाठीमागे बसला होता, तर श्रेयस भोसले हा दुचाकी चालवत होता. दोघा हल्लेखोरांनी चालत्या दुचाकीवर अमर पवारवर नेम धरला. मात्र, त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे हल्लेखोराचा नेम चुकला. त्यामुळे पिस्तुलातून सुटलेली गोळी अमरच्या पायाच्या पोटरीवर लागली, अन्यथा मोठा अनर्थ घटला असता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिस