कराड (जि. सातारा) : टोल भरण्यास सांगितल्याचा कारणावरून नऊ ते दहा जणांनी दोघा टोलवसुली कर्मचाऱ्यांस शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवार, दि. ८ रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास तासवडे तोल नाक्यावर घडली. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध तळबीड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास गाडी (एमएच १३ बीएन ८८७३) ही पी. ५ लेनवरून टोल न भरता निघाली होती. म्हणून टोलनाक्यावरील कर्मचारी हर्षद संभाजी लवंघरे (वय ३०,तासवडे टोल नाका, कराड) यांनी गाडीवरील चालक कुलदीप होनाजी सोलनकर (रा. माळेगाव ता. बारामती) यास गाडी थांबविण्यास सांगितले, तसेच ‘तुम्ही टोल न भरता जात आहात, टोल भरून जावे किंवा ऑनलाइन जेवढा टोल असेल तो भरावा,’ अशी विनंती केली. टोल भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने कुलदीप सोलनकर आणि गाडीतील इतर चार व दुसऱ्या गाडीतील इतर चार जणांनी हर्षद लवंघरे, तसेच प्रशांत शिवदास या दोघांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.दरम्यान, मारहाणप्रकरणी हर्षद संभाजी लवंघरे यांनी कुलदीप होनाजी सोलनकर रा. माळेगाव (ता. बारामती) आणि त्याचे इतर सहकारी अजय महादेव निगडे (२०, रा. लामजेवाडी, ता. बारामती), लोभ दादासाहेब बोडके, युवराज बापूराव सोलनकर, निखिल यशवंत सोलनकर (२२, तिघे रा. माळेगाव, ता. बारामती), तसेच सोबत असणाऱ्या गाडी (एमएच १२ टीव्ही ९८५४) मधील निर्भय विकास पवार (२१), रिजवान सलीम पठाण (१८), पार्थ नितीन सागर (१९, तिघे रा. माळेगाव, ता. बारामती), आर्यन मोहन कोकरे, अभिषेक अनिल धुमाळ (दोघे रा. धुमाळवाडी, ता. बारामती), सुशांत अजय देवकाते (२२, रा. निरावागज, ता. बारामती) यांच्याविरुद्ध तळबीड पोलिस ठाण्यात हर्षद संभाजी लवंघरे (३०, तासवडे टोल नाका, कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
Web Summary : In Satara, a toll payment dispute led to ten individuals assaulting two toll booth employees at Tasawade toll plaza. The incident occurred after workers requested payment from a vehicle bypassing the toll. Police have registered a case against the accused.
Web Summary : सतारा में टोल भुगतान विवाद के चलते दस लोगों ने तासवडे टोल प्लाजा पर दो टोल बूथ कर्मचारियों पर हमला कर दिया। घटना तब हुई जब कर्मचारियों ने टोल से गुजर रहे एक वाहन से भुगतान करने का अनुरोध किया। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।