Two lakh gutkas seized from grocery stores in Satara | साताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्त

साताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्त

ठळक मुद्देसाताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्तएकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : येथील शनिवार पेठेतील जयहिंद किरणा स्टोअर्समध्ये दोन लाख १९ हजार ८३० रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे.

सद्दाम नौशाद मोदी (रा. नकाशापुरा शनिवार पेठ, सातारा) असे अटक झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शनिवार पेठेतील जयहिंद किराणा स्टोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला सतर्क करून तेथे पाठविले. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास टीम तेथे पोहोचल्यानंतर किराणा स्टोअर्सची झडती घेण्यात आली. त्यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा सापडला. हा साठा पोलिसांनी जप्त करून मालक सद्दाम मोदी याला अटक केली.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनिर मुल्ला, प्रमोद सावंत आदींनी केली.
 

Web Title: Two lakh gutkas seized from grocery stores in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.