दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 17:16 IST2019-12-23T17:15:43+5:302019-12-23T17:16:22+5:30
आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये पहाटेच्या सुमारास फिरण्याकरिता गेलेल्या महिलेला दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिला ठार झाली आहे. यामध्ये सिंधूबाई वासुदेव भरगुडे (वय ५५,रा. शिरवळ ता.खंडाळा ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिला ठार
ठळक मुद्देदुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिला ठार शिरवळ पोलीस स्टेशनला नोंद
मुराद पटेल
शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये पहाटेच्या सुमारास फिरण्याकरिता गेलेल्या महिलेला दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिला ठार झाली आहे.
सिंधूबाई वासुदेव भरगुडे (वय ५५,रा. शिरवळ ता.खंडाळा ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. शिरवळ येथील उद्योजक दिनेश भरगुडे यांच्या त्या मातोश्री आहेत.
यावेळी सिंधूबाई भरगुडे यांच्या मृतदेहाचे शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.