शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी-दुचाकी धडकेत दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

मायणी : मल्हारपेठ- पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या देशमुखवस्ती (विखळे) येथील चारचाकी व दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन ...

मायणी : मल्हारपेठ- पंढरपूर राज्यमार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या देशमुखवस्ती (विखळे) येथील चारचाकी व दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन दोनजण जागीच ठार झाले, तर अन्य चारजण जखमी झाले. मृतांमध्ये एक मायणीतील तर दुसरा लातूर येथील आहे. सूरज राजाराम माळी, संतोष किसनराव बिराजदार अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील सय्यदपूर, ता. देवणी येथील बिराजदार कुटुंब शनिवारी कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून रविवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूरहून सय्यदपूर या ठिकाणी निघालेले होते. ते रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मायणीजवळील विखळे हद्दीत आले.

विखळे येथील देशमुख वस्तीजवळ मोटारसायकलवरील (एमएच ११ सीएफ ८५१९) सूरज राजाराम माळी (वय २७, रा. मायणी, मानमोडी, ता. खटाव) तर चारचाकी (एमएच १४ जीयू ६७९८) यांच्यात जोरदार अपघात झाला. यामध्ये सूरज माळी व संतोष किसनराव बिराजदार (४०, रा. सय्यदपूर ता. देवणी. जि. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजकुमार बिराजदार (२५), ज्योतीराम धनाजी बिराजदार (३५), दत्ता बिराजदार (३२), महेश विठ्ठल झोळकुडे (२४, सर्व राहणार सय्यदपूर, ता. देवणी) हे जखमी झाले. त्यांना मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करून सातारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हा अपघात इतका भयानक होता, की चारचाकी दुचाकीला धडकून रस्त्याकडेच्या छोट्या ओढ्यावरील कठड्याला जाऊन धडकली. चालक महेश विठ्ठल झोळकुडे (२४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी तपास करत आहेत.