शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
2
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
3
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
4
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
5
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
6
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
7
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
8
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
9
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
10
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
11
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
12
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
13
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
14
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
16
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
17
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
18
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
19
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
20
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Satara Accident: मित्राचे लग्न; गावदेव दर्शनाहून परतताना कारला समोरुन ट्रकची धडक, दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:20 IST

ओगलेवाडी येथे ट्रक, कारची धडक; दोन जखमी

कराड : पुसेसावळी (ता. खटाव) येथे मित्राच्या लग्न गावदेव दर्शनाचा कार्यक्रम संपवून कारने घरी परत येत असताना चार मित्रांच्या कारला समोरून ट्रकची जोरदार धडक बसली. त्यामध्ये दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाला. हा भीषण अपघात बुधवारी रात्री एकच्या सुमारास ओगलेवाडी रेल्वे पुलावर झाला.कारचालक ओमकार राजेंद्र थोरात (वय २८), गणेश सुरेश थोरात (२५, दोघेही रा. ओंड, ता. कराड) अशी ठार झालेल्या मित्रांची नावे आहे. तर हृषिकेशन कुबेर थोरात (२८ रा. ओंडे), व रोहन पवार (२५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुसेसावळी येथे मंगळवारी मित्राच्या लग्न गाव देवदर्शनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी चाैघेजण कारने पुसेसावळीला गेले होते. तो कार्यक्रम आटोपून पुन्हा कराडकडे परतत होते. कराड-विटा राज्य मार्गावर बुधवारी रात्री एकच्या सुमारास ओगलेवाडी येथील रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. त्यामध्ये ओमकार व सुरेश हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. स्थानिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कराड शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

ओंड गावावर शोककळाअपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही तरुण ओंड (ता. कराड) येथील रहिवासी आहेत तर जखमी असणारा एक तरुणही ओंडचाच आहे. मात्र, या दोन्ही तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने ओंड गावावर शोककळा पसरली. त्या दोघांच्याही पार्थिवावर दुपारी एक वाजता ओंड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मित्राचे लग्न होते बुधवारीपुसेसावळी (ता. खटाव) येथे बुधवार, दि.२६ रोजी मित्राचे लग्न होते. आदल्या दिवशी हे सर्व मित्र गावदेव दर्शनाचा कार्यक्रमाला गेले होते. तेथून परत येताना ही दुर्दैवी घटना घडली.

बरडजवळ भीषण अपघातात एक ठारपुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथे मुबंई येथील कोळीवाडा येथून पंढरपूरकडे अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स दुभाजकावर जाऊन जोरदार आदळली. विशेष म्हणजे या दुभाजकामध्ये रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.जालिंदर लक्ष्मण सस्ते (वय ६०, रा. बरड, ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Accident: Truck collision after wedding, two dead, two injured.

Web Summary : Near Satara, a truck collided with a car returning from a wedding event, killing two and injuring two. The accident occurred on the Karad-Vita highway. The deceased were identified as Omkar Thorat and Ganesh Thorat.