शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

साताऱ्यात ‘मोक्का’तील गुंडांकडून सहा पिस्टल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:40 IST

मोक्कामधून जामिनावर सुटले होते

सातारा : मोक्कामधून जामिनावर सुटताच तडीपारीचा भंग करत दोन सराईत गुंड पिस्टल व जिवंत काडतुसांची विक्री करीत होते. त्यासाठी ते लोणंद-नीरा मार्गावरील रेल्वे पुलावर आले. त्यावेळी सातारा एलसीबी व लाेणंद पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ पिस्टलसह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमित ऊर्फ बिऱ्या कदम (रा. लोणी, ता. खंडाळा) व विशाल महादेव चव्हाण (रा. भोळी, ता. खंडाळा), अशी दोघांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. ५) मोक्कातून जामिनावर सुटलेले व जिल्ह्यातून तडीपार असलेले अमित ऊर्फ विऱ्या कदम व विशाल महादेव चव्हाण राखाडी रंगाच्या कारमधून (क्र. एमएच १२ टीएस १८८९) नीरा ते लोणंद मार्गावर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्यास येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी रोहित फार्णे यांना पथकासह जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.या पथकाने लोणंद ते नीरा मार्गावरील रेल्वे पुलावर सापळा लावून कारमधील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा पिस्टल, ३० काडतुसांसह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोघांवरही लोणंद पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगून तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी, तसेच भारतीय हत्यार अधिनियमानुसार गुन्हा नोंद केलेला आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर व रोहित फार्णे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

जप्त केलेला मुद्देमालकारवाईत सहा देशी बनावटीचे पिस्टल, ६ मोकळ्या मॅग्झिन्स, ३० जिवंत काडतुसे, २ मोबाइल हॅण्डसेट व कार, असा १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस