खिंडवाडी येथे टेम्पो उलटून दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 16:22 IST2019-09-13T16:22:23+5:302019-09-13T16:22:56+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोेघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास झाला.

खिंडवाडी येथे टेम्पो उलटून दोघे जखमी
ठळक मुद्देखिंडवाडी येथे टेम्पो उलटून दोघे जखमीजखमींना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोेघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास झाला.
बेळगावहून पालघर येथे बेकरी मशीन घेऊन टेम्पोचालक (एमएच ०९ इएम २०४०) निघाला होता. खिंडवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. मात्र, सुदैवाने दोघेही बचावले.
या अपघातानंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. दोघा जखमींना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीतच हा अपघात झाल्याने पोलिसांनी पळापळ झाली. बंदोबस्त सोडून पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागले.