वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या दोघांना अटक, ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 13:05 IST2019-08-19T13:00:52+5:302019-08-19T13:05:40+5:30
पार्किंगमध्ये तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची बाटरी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. किरण संजय काटे (वय २५, रा. राऊतचाळ, ता. बार्शी. जि. सोलापूर), प्रमोद काशिनाथ सकट (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या दोघांना अटक, ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : पार्किंगमध्ये तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. किरण संजय काटे (वय २५, रा. राऊतचाळ, ता. बार्शी. जि. सोलापूर), प्रमोद काशिनाथ सकट (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये दोन युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर गवसने यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा रचला. त्यावेळी पोलिसांनी काटे आणि सकट या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता या दोघांनी वाहनांच्या बॅटरी चोरल्याची कबुली दिली. सुमारे ३७ हजारांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे. हे दोघे सराईत असून, त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचन, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख, वैभव सावंत, साहेबराव साबळे यांनी सहभाग घेतला.