शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

साताऱ्यातील कराड उत्तरेत 'मनो"धैर्य' एकवटतयं!, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 'कमळ' फुलवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 11:57 IST

बाळासाहेब पाटलांचा विजयाचा चौकार

प्रमोद सुकरेकराड : राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो; याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. असाच प्रत्येय सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येताना दिसतोय. गत विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढलेले दोन उमेदवार चक्क 'कमळ' फुलवण्यासाठी सक्रिय झालेले दिसत आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचं 'मनो''धैर्य' एकवटताना पाहयला मिळतयं. पण शेवटी भाजपचा उमेदवार कोण ?हा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे.कराड उत्तर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात कराड सह ४ तालुक्यातील भाग जोडला आहे. त्याच कराडचा वाटा जास्त आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी येथून विजयाचा चौकार मारला आहे.  त्यांना नेहमी तिरंगी लढतीचा फायदा झाला आहे हेही निश्चित!गत विधानसभा निवडणुकीला कराड उत्तरची जागा युतीमध्ये शिवसेनेला गेली. त्यामुळे भाजपचे काम करत असलेल्या मनोज घोरपडेंची गोची झाली. तर ऐनवेळी काँग्रेसच्या धैर्यशील कदम यांनी हातात 'धनुष्यबाण' घेण्यात बाजी मारली. पण निकालात त्यांना 'बाजीगर' होता आले नाही. अपक्ष उमेदवार मनोज घोरपडेंना जास्तीची व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. आणि बाळासाहेब पाटलांचा विजयाचा चौकार जोरात बसला.त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. बाळासाहेब पाटील राज्याचे सहकार मंत्री झाले. जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांना मिळाले. राजकीय वातावरण बदलले. त्याच दरम्यान एका प्रकरणात मनोज घोरपडेंना अटक झाली. त्यांना काही दिवस तुरुंगातही काढावे लागले. याच दरम्यान एक 'कदम' पुढे टाकत धैर्यशील दादांनी भाजपचे 'कमळ' हातात घेतले. त्यामुळे मनोज दादांना पुन्हा ''घोर'पडला.मध्यंतरी मनोज घोरपडेंना जामीन मिळाला. ते पुन्हा समाजकारण, राजकारणात सक्रिय झाले. पण आता कराड उत्तरेतील भाजपचा उमेदवार कोण? हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडलाय? त्याचे उत्तर वेळ आल्यावर नक्कीच मिळेल या शंका नाही.गत आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यात कराड उत्तर मध्ये बरेच कार्यक्रम झाले. त्यावेळी हे दोन्ही 'दादा' त्यांच्याबरोबर मंचावर दिसले. त्यावरून हे 'मनोधैर्य' एकवण्याचे संकेत मिळाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कराडच्या शासकीय विश्रामगहात उत्तर विधानसभा मतदार संघातील भाजपची आढावा बैठक झाली. त्यावेळी हे दोन दादा मांडिला मांडी लावून बसलेले दिसले.दोघांनीही उत्तरेत भाजपची ताकद वाढविण्याचा निर्धारही केलाय म्हणे...

दोघांच्यात काही दिवसांपूर्वीही झाली होती बैठककराड उत्तर भाजपचे नेते मनोज घोरपडे व धैर्यशील कदम या दोघांच्यात काही दिवसापूर्वीही एक बैठक झाल्याचे खात्रीशीर समजते. म्हणजेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावेळी महामार्गावरील एका गावात ,एका पदाधिकाऱ्यांच्या घरात या दोघांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली आहे. मात्र चर्चेचा तपशील त्या दोघांनाच माहीत .

एका म्यानात दोन तलवारी बसणार कशा ?एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत हे अगदी खरं आहे. पण भाजप कराड उत्तर मतदारसंघात एका म्यानात दोन तलवारी बसवू इच्छित आहे. आता ते अवघड काम सोपे कसे करणार? हे नेत्यांनाच माहीत.

मतदारसंघ नेमका कोणाकडे?गत विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळेच मनोज घोरपडेंची कोंडी झाली होती. आता देखील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोघांचं राज्यात सरकार आहे. उद्या विधानसभेच्या निवडणुकीला अशीच युती कायम राहील अशी अपेक्षा आहे. त्यावेळेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ नेमका भाजपला की बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाणार ?हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे बरं .

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस