शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

फटकुळ दादांची दहशत! फलटणमध्ये गुंडांच्या टोळीकडून दोन भावांवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:51 IST

१०-१२ जणांच्या टोळक्याने उघड्या तलवारी आणि शस्त्रांनी दहशत माजवत दोन निष्पाप भावांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.

फलटण शहराला लाभलेला शांततेचा आणि सांस्कृतिक लौकिक काल रात्री शंकर मार्केटमध्ये झालेल्या रक्तरंजित थराराने धुळीस मिळवला आहे. १०-१२ जणांच्या टोळक्याने उघड्या तलवारी आणि शस्त्रांनी दहशत माजवत दोन निष्पाप भावांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटना घडून १४ तास उलटूनही आरोपी मोकाट असून गुन्हा नोंद न झाल्याने नागरिकांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना घेराव घातला यावेळी नागरिकांनी व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या या घटनेचे तीव्र पडसाद आज फलटणमध्ये उमटले.

 फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक 'अरविंद काळे' या गुंडांवर कठोर कारवाई करणार का? असा थेट सवाल आता फलटणकर विचारत आहेत. "हातात शस्त्रे घेऊन दहशत माजवणाऱ्या त्या फटकुळ दादांची जुन्या गावठाणातून आणि शहरातून धिंड काढा" अशी आक्रमक मागणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

पोलिसांना अल्टिमेटम; 'मोक्का' लावा अन्यथा 'फलटण बंद' ठेवू!

शंकर मार्केट येथे गॅरेज चालवून उदरनिर्वाह करणारे अनिल विठ्ठल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना एक सविस्तर 'जाहीर निवेदन' दिले.

"हा हल्ला केवळ एका व्यवसायावर नसून तो फलटणच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. गुन्हेगारांवर तात्काळ 'खुनाचा प्रयत्न' आणि 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी. तपास संथ गतीने झाल्यास किंवा आरोपींना पाठीशी घातल्यास संपूर्ण 'फलटण शहर बंद' ठेवून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल," असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केलेला तीव्र संताप

 "आम्ही तिथे असतो तर त्यांना नुसते पाठवले नसते..., काल जो प्रकार घडला आहे त्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांची जुन्या गावठाणामधून धिंड काढण्यात यावी. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत. त्या पोरांचे नशीब आहे की काल आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. जर आम्ही तिथे असतो, तर आज ही परिस्थिती राहिली नसती, आम्ही त्यांना परत नुसते पाठवले नसते." - अझरुद्दीन ऊर्फ पप्पूभाई शेख (नगरसेवक)

  "शहरातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करा" :

  "या भयंकर प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलिसांनी शहरामध्ये सुरू असणारे सर्व बेकायदेशीर व्यवसाय आणि अवैध विक्री तातडीने बंद करावी. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी." - अनुप शहा (माजी विरोधी पक्ष नेते, फलटण नगरपरिषद)

 "पोलीस गुन्हेगारांना सामील असल्याचा संशय" 

 "शहरात जे अवैध प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, त्याची पोलिसांना पूर्ण माहिती असून पोलीसच यात सामील असल्याचा मोठा संशय आहे. फलटणला आता दोन नव्या पोलीस इमारती मिळाल्या आहेत. त्या इमारतींमधून पोलिसांनी गुंडांना अटकाव करण्याचे काम करावे." - अमोल सस्ते (युवा नेते)

 "गुंडांची धिंड काढा" 

"काल शंकर मार्केट येथे घडलेल्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करावी आणि त्यांची जुन्या गावठाणामधून धिंड काढावी." - जगन्नाथ ऊर्फ भाऊसाहेब कापसे

एकाला ठोकल्या बेड्या, 'नागरिकांना अपेक्षित तशीच कारवाई होईल' : पो. नि. अरविंद काळे

नागरिकांच्या आणि नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी तपासाची माहिती दिली.

ते म्हणाले, "काल घडलेला प्रकार अतिशय वाईट आहे. आरोपींना अटक करण्यासाठी आमची दोन पथके तत्काळ रवाना झाली असून, एका आरोपीला आम्ही अटक केली आहे. काल रात्रीच फिर्याद घेण्यासाठी पोलीस रुग्णालयात गेले होते, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (जखमींची प्रकृती गंभीर असल्याने) काल फिर्याद दाखल करता आली नाही. आज फिर्याद दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. नागरिकांना जे अपेक्षित आहे, अगदी त्याच कठोर पद्धतीने या गुंडांवर कारवाई करण्यात येईल. यापुढे शहरात सायंकाळपासूनच पोलिसांची गस्त अधिक वाढवली जाईल."

English
हिंदी सारांश
Web Title : Falton Brothers Attacked: Gang Terrorizes City; Action Demanded!

Web Summary : Falton city is tense after a gang attacked two brothers. Locals demand swift action, threatening a city shutdown if police fail to act against the criminals. Police claim one arrest has been made and promise stricter enforcement.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस