शिवीगाळीचा जाब विचारल्याने दोघा भावांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 13:08 IST2019-03-08T13:06:05+5:302019-03-08T13:08:22+5:30

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना जावळवाडी, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी चारजणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Two brothers assaulted after being questioned by Shivvili | शिवीगाळीचा जाब विचारल्याने दोघा भावांना मारहाण

शिवीगाळीचा जाब विचारल्याने दोघा भावांना मारहाण

ठळक मुद्देशिवीगाळीचा जाब विचारल्याने दोघा भावांना मारहाणचौघेजण ताब्यात; काठी डोक्यात मारल्याने जखमी

सातारा: शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना जावळवाडी, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी चारजणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिल आनंदराव जाधव, अरविंद आनंदराव जाधव, सुहास आनंदराव जाधव, निखील सुहास जाधव (सर्व रा. जावळवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माझ्या भावाला शिवीगाळ का करता, अशी विचारणा श्रीकांत गंगाराम कोंडवले (वय २७,रा. जावळवाडी) याने केली.

यावरून संशयितांनी श्रीकांत आणि त्याच्या भावाला काठीने डोक्यात मारहाण केली. यामध्ये दोघेही भाऊ जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर बोरगाव पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांनाही ताब्यात घेतले.

Web Title: Two brothers assaulted after being questioned by Shivvili