साताऱ्यात दोन एटीएम फोडले, १५ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 14:33 IST2018-12-04T14:32:22+5:302018-12-04T14:33:23+5:30
सातारा शहरालगत असलेल्या संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री दोन एटीएम मशीन फोडून १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली.

साताऱ्यात दोन एटीएम फोडले, १५ लाखांची रोकड लंपास
सातारा : शहरालगत असलेल्या संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री दोन एटीएम मशीन फोडून १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली.
याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्यातील संभाजीनगर येथे सोमवारी मध्यरात्री अमरलक्ष्मी स्टॉप परिसरात चोरट्यांनी एक एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. त्यानंतर चोरट्यांनी संभाजीनगरमध्ये आपला मोर्चा वळवला. तेथील बारावकरनगर परिसरात स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे.
ते चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने मशीन फोडून चोरट्यांनी १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.