शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याचे घर फोडून पाच लाखांची चोरी

By admin | Updated: November 28, 2015 00:17 IST

प्रतापगंज पेठेतील घटना : कुटुंब देवदर्शनाला गेले असताना चोरट्यांनी मारला डल्ला

सातारा : येथील प्रतापगंज पेठेत व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड, तीन मोबाईल आणि तीन चांदीची नाणी असा ऐवज लंपास केला. देवदर्शनास गेलेले कुटुंब गुरुवारी मध्यरात्री परतले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगंज पेठेत राधिका टॉकीजच्या जवळच सतीश गंगाराम रावखंडे (वय ५८) यांचे ‘गीतसागर’ हे दुमजली घर आहे. तळमजल्यावर तीन आणि पहिल्या मजल्यावर तीन अशा सहा खोल्या आहेत. रावखंडे, त्यांच्या पत्नी, मुलगा, सून आणि नात असे पाचजण तेथे राहतात. रावखंडे यांचा शेंगदाण्याचा व्यापार आहे. सोमवारी (दि. २३) सकाळी सव्वासात वाजता रावखंडे कुटुंब सौंदत्तीच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडले. मंगळवारी दर्शन घ्यायचे त्यांनी योजले होते. सौंदत्तीहून ते कोल्हापूरला आले आणि तेथून गुरुवारी (दि. २६) रात्री सव्वाबाराला घरी परतले. मात्र, घराच्या पुढील दरवाजास कुलूप दिसले नाही. आतून कडी घातल्याचे दिसून आले. त्यामुळे सतीश रावखंडे घराच्या मागील बाजूस गेले. मागील दरवाजा उघडा दिसताच घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील खोलीतील लोखंडी कपाट उघडे होते. त्यातील तीन मोबाईल गायब होते. आतील खोलीत असणारे लोखंडी कपाटही त्यांना उघडे दिसले. त्यात व्यापाऱ्यांना देण्यासाठी ठेवलेले पाच लाख रुपये ठेवले होते, तेही चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांच्या पावलांची ठसे त्यांना शोकेससमोरील टीपॉयवर दिसले. त्यामुळे शोकेसची पाहणी केली असता, त्यातील तीन चांदीची नाणी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्री उशिरा रावखंडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. पाच लाखांची रोकड, दहा हजार पाचशे रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि सातशे रुपये किमतीची चांदीची नाणी चोरीस गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)शेतीशाळेजवळश्वान घुटमळलेपोलिसांनी तातडीने तपास सुरू करून श्वानपथक बोलावले. श्वानाने रावखंडे यांच्या घराच्या मागील गल्लीपासून बुधवार पेठ, तेथून राधिका रस्ता असा माग काढला. मात्र, छत्रपती प्रतापसिंह शेतीशाळेच्या आसपास श्वान घुटमळले.चार-पाच महिन्यांपूर्वीच मी शेंगदाण्याचा घाऊक व्यापार सुरू केला आहे. रविवारी पुणे मार्केट बंद असते. तेथील व्यापाऱ्यांना देण्यासाठी पाच लाख रुपये मी घरात ठेवले होते. मंगळवारी देवीचे दर्शन व्हावे म्हणून सोमवारी आम्ही निघालो. परतलो तेव्हा पैसे गायब झाल्याचे समजले.- सतीश रावखंडे, व्यापारी