शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मालवणातील पर्यटन रडतखडत

By admin | Updated: November 9, 2014 23:29 IST

व्यावसायिकांना अडचणी : पर्यटन विकासाचे ‘व्हिजन’ नसल्यामुळे शासनाचे प्रयत्न तोकडे

संदीप बोडवे - मालवण -युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. मात्र, याचा केंद्रबिंदू राहिलेल्या मालवणमध्येही पर्यटन उद्योगाचा म्हणावा तसा विस्तार झालेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती, निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेने संपन्न असलेले शांत समुद्रकिनारे असतानाही मालवणचे पर्यटन रडतखडत सुरू आहे. स्थानिकांनी येथील पर्यटन व्यवसायाला उभारी देण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. शासनकर्त्यांकडे पर्यटन विकासाचे कोणतेही ‘व्हिजन’ नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.सर्वसमावेशक पर्यटन धोरणच नसल्याने प्रशस्त किनारपट्टी लाभूनही पर्यटन व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीआरझेडच्या अटींमुळे न्याहरी-निवासधारक अडचणीत आहेत. सागरी पर्यटनातील स्रॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग, पॅरासेलींग व वॉटर स्पोर्टस्ना परवान्यांची प्रतीक्षा आहे. किनारपट्टीवरील एकंदरीत सर्वच पर्यटन व्यवसायावर अनधिकृतचा शिक्का बसलेला आहे.अनधिकृत शिक्का कधी पुसणारमालवणमधील वाढत्या पर्यटनामध्ये सागरी पर्यटनाचा मोठा वाटा आहे. येथील सागरी पर्यटनाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. तालुक्यात मागील पाच-सहा वर्षांपासून सागरी पर्यटनात नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, बहुतांश सागरी पर्यटनामध्ये नियमावलीच तयार करण्यात आलेली नसल्याने या पर्यटन व्यावसायिकांना परवाने देण्यात आलेले नाहीत. यामुळे येथील सागरी पर्यटनावर अनधिकृतचा शिक्का बसलेला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे येथील सागरी पर्यटनात दर्जा असूनही ते अधिकृत होऊ शकलेले नाही. स्रॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग, पॅरासेलिंग तसेच विविध वॉटर्स स्पोर्टस्धारकांना याचा फटका बसत आहे. व्यावसायिक यामुळे नाराज आहेत.सी-वर्ल्ड सर्वसहमतीने व्हावासी-वर्ल्डसारखा पर्यटनात आमुलाग्र बदल घडविणारा प्रकल्प तालुक्यात उभा राहिल्यास मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटन उद्योगाला हत्तीचे बळ येणार आहे. मात्र, हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे रखडला आहे. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प केल्यास मालवणच्या पर्यटनात मोठा बदल घडून येणार आहे.