The tourist injured at Mahabaleshwar after falling from a horse | महाबळेश्वर येथे घोड्यावरून पडून पुण्याचा पर्यटक जखमी

महाबळेश्वर येथे घोड्यावरून पडून पुण्याचा पर्यटक जखमी

ठळक मुद्देमहाबळेश्वर येथे घोड्यावरून पडून पुण्याचा पर्यटक जखमीवेण्णालेक येथे घोडेसवारी करताना तोल गेला

महाबळेश्वर : वेण्णालेक येथे घोडेसवारी करताना पुणे येथून महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेले आशिष भाटिया हे किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथून आशिष भाटिया हे पत्नी व मुलांसमवेत दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरला पर्यटनासाठी आले आहेत. दोन दिवस येथील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर शुक्रवारी परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी वेण्णालेक येथे घोडेसवारीसाठी ते आले.

आपल्या लहान मुलांसमवेत ते घोडेसवारीसाठी घोड्यावर बसले. मात्र घोड्यावरून त्यांचा तोल गेल्याने ते खाली मैदानावर कोसळले. त्यांच्यासोबत घोड्यावर बसलेला त्यांचा लहान मुलगा बचावला.

जखमी भाटिया यांना स्थानिक घोडे व्यावसायिकांनी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले. त्यांच्या माणक्यास दुखापद झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पाचगणी येथील बेल एअर रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे.

Web Title: The tourist injured at Mahabaleshwar after falling from a horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.