शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

झोका खेळत असताना गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू, साताऱ्यातील तडवळेतील दुर्दैवी घटना

By दत्ता यादव | Updated: March 20, 2023 14:28 IST

लोखंडी पाइपला साडी बांधून खेळत होती झोका, अन् अचानक तिची मान साडीमध्ये अडकून गळ्याला फास लागला

सातारा : लोखंडी पाइपला साडी बांधून झोका खेळत असताना त्यात मान अडकून नऊ वर्षांच्या चिमुकलीचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. पोर्णिमा शंकर फाळके (वय ९, रा. तडवळे, ता. खटाव) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही घटना खटाव तालुक्यातील तडवळे येथे काल, रविवारी (दि. १९) घडली. या घटनेने तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोर्णिमा ही त्यांच्या घरामध्ये झोका खेळत होती. तिने लोखंडी पाइपला साडी बांधली होती. या साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती. त्याचवेळी खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास लागला. तिने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आला. यानंतर घरातल्यांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज, ता. खटाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. अशा प्रकारे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तडवळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शंकर पोपट फाळके (वय ४०, रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, महिला पोलिस हवालदार एस. एल. वाघमारे या अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू