शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘पुरवठा’ पथक थेट हॉटेल, धाब्यावर; सिलिंडर ‘ब्लॅकमेलिंग’वर ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:33 IST

दिवस-रात्र धडक मोहीम सुरू : शहरात ५ ठिकाणी पोलिस बंदोबस्तात सिलिंडर वितरण सुरू

कराड : सातारा जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा पडणार नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जात असून, याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात धाड सत्र राबविले जात आहे. कराड पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे यांनी पथकासह रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आणि सोमवारी दिवसभर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्यासह कराड तालुक्यातील हॉटेल, धाब्यांना अचानक भेट दिली.तसेच भेटीदरम्यान, काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा तर साठा कोणी करत तर नाही ना? याची देखील पाहणी केली. पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून धाड सत्र राबविले जात असल्याने कराड शहर व परिसरातील धाबे, हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोळसा, लाकडाची खरेदीगॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे धाबे, हॉटेल चालकांकडून थेट चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी त्यांच्याकडून लाकडे, कोळसा खरेदी केले जात आहेत. कराड तालुक्यात जवळपास सर्वच धाबेचालकांनी लाकडे खरेदी करून आणत ती स्वयंपाक खोलीबाहेर ठेवल्याचे दिसत आहेत.कराडच्या ‘या’ गावात गॅस सिलिंडरचे वितरणकराड तालुक्यातील कापील, शेरे, गोटे, मुंडे, सुपने, मल्हारपेठ, उंडाळे, कोयना वसाहत, मलकापूर, सैदापूर, गोवारे, टेंभू, खोडशी, वनवासनाची, काळगाव आदी गावात संबंधित एजन्सीच्या गाड्या व कर्मचाऱ्यांद्वारे सोमवारी गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले.‘जीवनावश्यक वस्तू कायदा’अंतर्गत होणार कारवाईसातारा जिल्ह्यातील घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर ‘जीवनावश्यक वस्तू कायदा’अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कारवाई करणारे ‘असे’ आहे पथक१) पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिल नायकवडे२) पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे३) पुरवठा लिपिक पूनम पाटील४) पुरवठा लिपिक वैष्णवी लोखंडे

कराडला ५ एजन्सींवर १० पोलिसांचा बंदोबस्तकराड शहरात सोमवारी पाच गॅस एजन्सीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. या ठिकाणी ग्राहकांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याचीदेखील पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.

कराड शहरात गॅस सिलिंडर वितरणामध्ये ब्लॅकमेलिंग सुरू असल्याची माहिती नागरिकांनी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनास द्यावी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. - दत्तात्रय दराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कराड शहर पोलिस ठाणेजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या सूचनेवर कराड शहरात व परिसरात हॉटेल, धाब्याच्या ठिकाणी रविवारी रात्री अचानक भेट देत पाहणी केली. पोलिस प्रशासनासोबत चर्चा केली असून, धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. - साहिला नायकवडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, कराड

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Supply Team Raids Hotels, Dhabas; Watches Cylinder Blackmailing

Web Summary : Satara administration cracks down on gas cylinder black marketing with raids on hotels and dhabas. Teams are inspecting establishments, ensuring no illegal stockpiling. Action is threatened under the Essential Commodities Act for misuse. Police provide security during distribution.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरSatara areaसातारा परिसरhotelहॉटेल