सातारा : तळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा, ४७ गावांची तहान अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:10 IST2018-03-19T14:10:47+5:302018-03-19T14:10:47+5:30
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

सातारा : तळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा, ४७ गावांची तहान अवलंबून
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच म्हणजे दिवाळीनंतर अनेक गावांतून पाणी टँकरची मागणी होत असते. गेल्या दोन वर्षांत या भागात झालेल्या जययुक्त शिवारच्या कामामुळे बरीच गावे आज टँकरमुक्त झाली आहेत. तर अनेक गावांचे भवितव्य हे या भागातील असलेल्या पाझर तलावातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे.
या भागातील तळहिरा, नांदवळ आणि अरबवाडी हे प्रमुख तलाव गेल्यावर्षीच्या पावसात केवळ ५० टक्के भरले होते. तर वसना नदीवरील नांदवळ पाझर तलाव शंभर टक्के भरला होता. मात्र, या सर्व तलावांतून सध्या रात्री आणि दिवसाही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे हे तलाव आता रिकामे होऊ लागले आहेत.
तळहिरा, अरबावाडी तलावांतून तर दिवसाही खुलेआम अनेक विनापरवाना मोटारीद्वारे पाणी उपसा केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही या विभागाने कानावर हात ठेवण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
अरबावाडी तलावाचा आधार या भागातील अरबवाडी, अंबवडे, बनवडी, इब्राहमपूर, खामकरवाडी या गावांना आहे. तर तळहिरा पाझर तलावावर तळिये, वाठार स्टेशन, देऊर या गावांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणी उपसा थांबविण्याचे काम जिल्हाधिकाºयांनी करावे, अशी या भागातील ग्रामस्थातून मागणी होत आहे.