शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खड्डेमय रस्त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावला, पाठीमागील दोन ट्रक धडकले; अडकलेल्या चालकाची आठ तासांनंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:40 IST

अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील दोन ट्रक मागून धडकले

कोयनानगर : कराड-चिपळूण महामार्गावरील तामकडे एमआयडीसीजवळ शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांची भीषण साखळी धडक झाली. या अपघातात एका ट्रकचा चालक आत अडकून पडला होता. तब्बल आठ तासांच्या अखंड बचावकार्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले.याबाबत अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड-चिपळूण महामार्गावर रात्री साडेअकरा वाजता तामकडे गावाचा हद्दीत कोयनानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहन नवीन रस्ता असल्याने वेगाने धावत असताना पुढे कच्चा व खड्डेमय रस्ता सुरू झाला आहे. यामुळे पुढच्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील दोन ट्रक मागून धडकले. यामध्ये सर्वात शेवटचा ट्रक (केए ३२ एबी ५३९६) पुढचा ट्रकवर जोरदार धडकला. यामुळे त्याचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपून गेला. यामध्ये ट्रक चालकाचे पाय अडकल्याने तो अडकून पडला होता.अपघाताची माहिती मिळताच पाटण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी इतर वाहन चालक तसेच स्थानिक नागरिकांनी मिळून बचाव कार्य सुरू केले. कडाक्याच्या थंडीतही जनरेटर, वेल्डिंग कटर, गॅस कटर आणि जेसीबीच्या साह्याने ट्रकचा चेपलेला पुढील भाग तोडत चालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे आठ तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाची सुटका करण्यात आली. त्यानंतर पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाटण येथे दाखल करण्यात आले. या अपघाताची सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती.उपाययोजनेची गरजरस्त्याचे काम सुरू असताना अनेक छोटे-मोठे अपघात होत आहे. तरी महामार्ग विभागाने ठेकेदाराकडून काम सुरू असलेल्या सर्व ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करून ‘सिंगल लाइन’ माहिती सूचना फलक, स्पीड कंट्रोल बोर्ड, ब्लिंकर्स यांची तातडीने व्यवस्था करावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Pothole causes truck crash; driver rescued after eight hours.

Web Summary : A truck driver was trapped for eight hours after a three-vehicle pile-up near Tamakade MIDC on the Karad-Chiplun highway due to potholes. Rescue efforts involved police, locals, and heavy machinery to free the driver, who was then hospitalized. Safety measures are urged during road construction.