शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील तीन शाळांचा राज्यस्तरीय गौरव, स्वच्छ विद्यालयासाठी राष्ट्रीय नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:48 IST

माध्यमिक विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा प्रथम, तर प्राथमिक विभाग शहरीतून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा प्रथम

सातारा : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून १४ शाळांचे नामांकन करण्यात आले होते. यामध्ये जावळी तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विभागात पाटण तालुक्यातील तळमावले येथील एस वाल्मिकी विद्यामंदिर व शहरी विभागात पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या तिन्ही शाळांचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे जिल्ह्यातील शाळांना राज्य पातळीवर गौरवण्यात आल्याने शिक्षण विभागाचा नावलौकिक वाढला आहे.शिक्षण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ९३.९८% शाळांनी सहभाग घेतला होता. या शाळांचे मूल्यमापन करून जिल्हास्तरावरून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातील चौदा शाळांचे नामांकन पाठविण्यात आले होते. या शाळांची राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होऊन प्राथमिक विभागातून ग्रामीण भागातील सहा शाळांची निवड करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शाळा पहिली आली असून सहाव्या क्रमांकावर ओझरे तालुका जावळी शाळेची निवड झाली आहे. ९३.८% गुण या शाळेस मिळाले आहेत.माध्यमिक विभागातून राज्यातील सहा शाळांची निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा प्रथम आली आहे. यात एस वाल्मिकी विद्यामंदिर तृतीय क्रमांकावर असून शाळेला ९६.०४ टक्के गुण मिळाले आहेत. प्राथमिक विभाग शहरीतून चार शाळांची निवड करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा प्रथम आली आहे. पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल दुसऱ्या क्रमांकावर असून शाळेत ९६.०७ टक्के गुण मिळाले आहेत. जिल्ह्यातील तीन शाळांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी समाधान व्यक्त करून शिक्षक संस्थाचालक यांच्यासह विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. 

केंद्रस्तरावर जिल्ह्यातील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाला असून हे विद्यार्थी व शिक्षकांचे यश आहे. या तिन्ही शाळांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळणं ही जिल्ह्यासाठी कौतुकास्पद बाब आहे. पुढील वर्षी जिल्ह्यातील आणखी शाळांचा समावेश होण्यासाठी प्रयत्नशील राहू. - प्रभावती कोळेकर, शिक्षण अधिकारी माध्यमिक सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळाkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग