शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघे 'लाचलुचपत'च्या जाळ्यात, तीन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:43 IST

पदोन्नतीसाठी मागितली लाच...

सातारा : खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना एका खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १०) रंगेहाथ पकडले. त्यानंतर अध्यक्षांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.मध्यस्थ खासगी व्यक्ती रवींद्र गणपत पवार (वय ३६, रा. खटाव) याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले, तर लाच मागण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील (५९, रा. खटाव, ता. खटाव) तसेच शहाजीराजे महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर अनिल सदाशिव गुजर (४२, रा. खटाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पदोन्नतीसाठी मागितली लाच...याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती मिळावी, तसेच कमिटीचे चेअरमन म्हणून शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नियुक्तीचे पत्र देण्याच्या कामासाठी अध्यक्ष अजित पाटील यांच्या वतीने मध्यस्थ रवींद्र पवार यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदार यांनी यासंदर्भात १० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस पथकाने मंगळवारी खटाव येथे सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष लाच घेताना रवींद्र पवार याला तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत ही रक्कम अध्यक्ष अजित पाटील यांच्यासाठी घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Education Head, Two Others Arrested in Bribery Case

Web Summary : Satara: Education society president and two others arrested by anti-corruption bureau for accepting a bribe of ₹3 lakh. The bribe was for professor promotion.