साताऱ्यात मटका चालविणारे तिघे तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:24 IST2019-06-17T15:23:16+5:302019-06-17T15:24:53+5:30

सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

Three crew members of Satara | साताऱ्यात मटका चालविणारे तिघे तडीपार

साताऱ्यात मटका चालविणारे तिघे तडीपार

ठळक मुद्देसाताऱ्यात मटका चालविणारे तिघे तडीपार तिघांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव

सातारा : शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

सचिन प्रल्हाद सुपेकर (वय ४२, टोळी प्रमुख, रा. गुरुवार पेठ, सातारा), दीपक मारूती पवार (वय ५८, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), पापा गेणु गवळी (वय ३६, रा. प्रतापसिंह नगर खेड, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर व परिसरात मटका आणि जुगार चालवून या तिघांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव निर्माण होत होता.

पोलिसांनी वेळोवेळी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून या तिघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाली असून, संबंधित तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अधीक्षक सातपुते यांनी दिला आहे.

Web Title: Three crew members of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.