शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

युवकाच्या खुनाचा प्रयत्नप्रकरणी तिघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 3:21 PM

उसने पैसे मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करून सागर संपत मोरे (वय ३१, रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी, ता. कोरेगाव) या युवकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तिघांना वेगवेगळी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देयुवकाच्या खुनाचा प्रयत्नप्रकरणी तिघांना शिक्षादोन महिन्याची शिक्षा

सातारा : उसने पैसे मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करून सागर संपत मोरे (वय ३१, रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी, ता. कोरेगाव) या युवकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तिघांना वेगवेगळी शिक्षा सुनावली.सोन्या उर्फ आकाश अविनाश मोरे (वय २३) याला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तर अविनाश भैरू मोरे (वय ५५), विश्वास भैरू मोरे (वय ६१, सर्व रा. पंचशीलनगर खेड- नांदगिरी, ता. कोरेगाव) यांना दोन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, फियार्दी प्रल्हाद बाजीराव मोरे (वय ६०), सागर संपत मोरे (वय ३१, दोघेही रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी ता. कोरेगाव) हे १५ एप्रिल २०१८ रोजी रात्री सव्वा दहा वाजता सोन्या ऊर्फ आकाश मोरे यास उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. त्याचा राग मनात धरून तिघांनी संगनमताने सागर मोरे याच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकली. अविनाश मोरे, विश्वास मोरे यांनी सागरला शिवीगाळ, दमदाटी करून हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यावेळी सोन्या मोरे याने सागर याचा खून करण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने छातीवर एक व पाठीवर दोन वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक डी. डी. चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने सोन्या उर्फ आकाश मोरे याला तीन वर्षे सक्तमजुरी तर अविनाश मोरे आणि विश्वास मोरेला दोन महिन्याची शिक्षा सुनावली. सहायक जिल्हा सरकारी वकील एन. डी. मुके यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे हवालदार धनंजय दळवी व त्यांच्या टीमने त्यांना सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर