शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: पतसंस्थेतील २४ कोटींच्या अपहार प्रकरणात तिघांना अटक; चेअरमन, व्यवस्थापकासह संचालकाचा समावेश

By दत्ता यादव | Updated: October 29, 2022 14:52 IST

तब्बल चार वर्षांनंतर अटक

दत्ता यादवसातारा : कोळकी, ता. फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २४ कोटी १ लाख ६० हजार ७६१ रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या संस्थेच्या चेअरमनसह संचालक आणि व्यवस्थापकाला तब्बल चार वर्षांनंतर अटक केली.नितीन शांतीलाल कोठारी (वय ६६, रा. तेली गल्ली, बुधवार पेठ फलटण), माधव कृष्णा अदलिंगे (५६, रा. जाधववाडी नाळे मळा, फलटण), जावेद पापाभाई मणेर (५२, रा. धनगरवाडा, बुधवार पेठ, फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोळकी, ता. फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील चेअरमन, संचालक, व्यवस्थापकांनी पतसंस्थेच्या ठेवीदारांकडून ठेवीच्या रकमांचा अपहार करून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी ३१ जानेवारी २०१९ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास साताऱ्यातील आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. गेल्या चार वर्षांपासून वरील संशयित पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी वरील संशयित हे साताऱ्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली.पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, सहायक फाैजदार प्रमोद नलावडे, मनोज जाधव, संतोष राऊत, शफिक शेख आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस