कार पेटवल्याप्रकरणी तिघांना अटक, अल्पवयीन युवकाने पेटवल्याचे निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 14:07 IST2019-03-08T14:04:19+5:302019-03-08T14:07:27+5:30
शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये घराजवळ लावलेली कार पेटवल्याप्रकरणी तिघांसह अल्पवयीन युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे.

कार पेटवल्याप्रकरणी तिघांना अटक, अल्पवयीन युवकाने पेटवल्याचे निष्पन्न
शिरवळ : शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये घराजवळ लावलेली कार पेटवल्याप्रकरणी तिघांसह अल्पवयीन युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी,शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये अभिजित राजेंद्र सोनावणे याच्या मालकीची कार (क्र.एमएच-११-बीव्ही-७६३३) हि घरासमोर दि.२४ फेब्रुवारी रोजी लावली होती. यावेळी दि.२४ फेब्रुवारी रोजी संबधित कार जळाली होती. त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मित जळीत म्हणून नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, दि. २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पंकज प्रकाश पाटील,मुरलीधर बबन सोनावणे,विशाल मुरलीधर सोनावणे (सर्व रा.शिंदेवाडी ता.खंडाळा) व एका अल्पवयीन युवकाने संबंधित कार पेटवल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते.
त्यानुसार पंकज पाटील , मुरलीधर सोनावणे, विशाल सोनावणे यांच्यासह अल्पवयीन युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली. याबाबतची फिर्याद अभिजित सोनावणे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार संतोष मठपती हे करीत आहे.