जावळीच्या उपसभापतींना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:03 IST2020-02-22T12:01:50+5:302020-02-22T12:03:17+5:30
जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कुडाळ दूरक्षेत्रात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

जावळीच्या उपसभापतींना जीवे मारण्याची धमकी
ठळक मुद्दे जावळीच्या उपसभापतींना जीवे मारण्याची धमकीटोळी हटविण्याच्या कारणावरून वाद
सातारा : जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कुडाळ दूरक्षेत्रात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
किसनवीर कारखान्याचे संचालक चंद्रसेन शिंदे व कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कुडाळ येथे अपुलकी पेट्रोल पंपासमोर उप सभापती सौरभ शिंदे यांची जमीन आहे.
या जमिनीलगत किसनवीर कारखान्याची टोळी सध्या वास्तव्यास आहे. ही टोळी हटविण्याच्या कारणावरून वाद होऊन शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.